जळगाव जिल्ह्यात उष्माघातामुळे महिलेचा मृत्यू !

मोसमातील पहिला बळी 

प्रतिकात्मक चित्र

जळगाव – येथे सध्या उष्णतेची लाट पसरली असून तापमान ४५ अंश सेल्सियस इतके झाले आहे. अमळनेर येथील रूपाली राजपूत यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. त्या एका विवाह समारंभासाठी अमरावती येथे गेल्या होत्या. रेल्वेतून प्रवास करून भर उन्हातून घरी परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. उलट्या होऊ लागल्या. काही वेळाने त्यांची शुद्ध हरपली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र आधुनिक वैद्यांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले.