मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड !
सातारा दौरा रहित !
सातारा – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा दौरा नियोजित होता; पण त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे त्यांचा दौरा अचानक रहित करण्यात आला आहे. मुंबई येथील राजभवनावरून ते सातारा-पाटण येथे कार्यक्रमासाठी जात होते. बिघाड झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने हेलिकॉप्टर तातडीने उतरवण्यात आले आणि मुख्यमंत्र्यांच्या सातारा दौर्यासाठी दुसरे हेलिकॉप्टर मागवण्यात आले, अशी माहिती सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग#EknathShinde #Helicopterhttps://t.co/FgmAxWaed5
— SaamTV News (@saamTVnews) May 13, 2023