मुसलमानांच्या भीतीने दुर्गाडी गडावर महाराष्ट्र दिन साजरा करण्यास अनुमती नाकारली !
ठाणे येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलिसांची मोगलाई !
ठाणे, १३ मे (वार्ता.) – मुसलमानांच्या भीतीमुळे दुर्गाडी गडावर ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करायला येथील पोलिसांनी अनुमती नाकारली. यापूर्वी दुर्गाडी गडावर शिवजयंती साजरी करण्यासही पोलिसांनी अनुमती नाकारली होती.
सकल हिंदु समाजाच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दुर्गाडी गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि दुर्गाडी गडाचा इतिहास यांविषयी माहिती देण्यात येणार होती. याविषयी सकल हिंदु समाजाच्या वतीने बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये अनुमतीसाठी रितसर पत्र देण्यात आले होते; मात्र कायदा आणि सुव्यवस्था यांचे कारण पुढे करत पोलिसांनी या कार्यक्रमाला अनुमती नाकारली.
गडावर अतिक्रमण होऊ नये, याचा फलक लावण्यासही विरोध !
पोलिसांमध्ये मुसलमानांचे भय इतके आहे की, नियमानुसार गडाच्या प्रवेशद्वारावर ‘गडावर अतिक्रमण करू नये’, असा कायदेशीर फलक लावण्यासही पोलिसांनी अनुमती नाकारली आहे. ‘माळशेज नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र अन् पर्यटनस्थळ विकास समिती’च्या दुर्गाडी किल्ला प्रतिष्ठान आणि कल्याण बंदर प्राधिकरणाद्वारे दुर्गाडी गडावर अतिक्रमण होऊ नये, यासाठी हा फलक लावण्यात येणार होता. या फलकावर ‘हिंदु क्षत्रिय मराठा सातवाहन राजांचे कल्याण बंदर आणि दुर्गाडी गड, म्हणजे शिवभगवान सातवाहन साम्राज्य संरक्षित स्मारक आहे. ही संपूर्ण जागा दुर्गाडी गडाची आहे. या जागेचा मालकी हक्क ‘माळशेज नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र अन् पर्यटनस्थळ विकास समिती’कडे आहे. या जागेचे एकूण क्षेत्रफळ ७.०२ एकर आहे. या जागेवर अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येईल’, असे लिखाण या फलकावर होते.
फलकाला अनुमती नाही; मात्र नमाजपठणासाठी मंडपाला अनुमती !
अतिक्रमण होऊ नये, यासाठी गडाच्या प्रवेशद्वारावर फलक लावण्याला अनुमती नाकारणार्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी रमझान ईदच्या दिवशी दुर्गाडी गडावर मुसलमानांना मंडप उभारण्यास मात्र अनुमती दिली.
शिवजयंतीला विरोध; मात्र नमाजपठणाला अनुमती !
शिवजयंती आणि महाराष्ट्र दिन साजरा करण्यास अनुमती नाकारणारे पोलीस ईदच्या दिवशी मात्र गडावर नमाजपठण करण्यास अनुमती देतात. या कालावधीत गडावरील दुर्गादेवीच्या मंदिरात पूजाविधी करण्यासही पोलीस आडकाठी करतात. २२ एप्रिल या दिवशी रमझान ईदनिमित्तही गडावर नमाजपठण करण्यास अनुमती दिली. अशा प्रकारे मुसलमानांना अनुमती देणारे पोलीस हिंदूंना अनुमती नाकारून हिंदूंसमवेत दुजाभाव करत आहेत.
पोलिसांच्या महाराष्ट्रद्रोहाच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्याची चर्चा !
महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी अनुमती नाकारणार्या पोलिसांच्या विरोधात त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार करण्याविषयीची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
संपादकीय भूमिकाअसे पोलीस काम कुणासाठी करतात, महाराष्ट्र शासनासाठी कि अतिक्रमण करणार्यांसाठी ? |