पाकने १९८ भारतीय मासेमार्यांची केली सुटका !
मासेमारी करतांना चुकून ओलांडली होती समुद्री सीमा !
अमृतसर (पंजाब) – पाकिस्तान सरकारने १२ मेच्या रात्री येथील अटारी सीमेवरून पाकच्या कारागृहात असणार्या भारताच्या १९८ मासेमार्यांची सुटका केली. या मासेमार्यांना आंतरराष्ट्रीय समुद्री सीमा ओलांडून पाकच्या सीमेत घुसल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. या मासेमार्यांनी मासेमारी करतांना सीमा ओलांडल्याचे लक्षात आले नसल्याचे सांगितले.
198 Indian fishermen released from Pakistani jail https://t.co/CneZ80P9Gr
— TOI India (@TOIIndiaNews) May 13, 2023
संपादकीय भूमिकाभारतीय मासेमार्यांना समुद्रातील सीमा लक्षात येण्यासाठी भारत सरकारने व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. यामुळे चुकून सीमा ओलांडल्यामुळे या मासेमार्यांना होणारा नाहक त्रास अल्प होऊ शकेल ! |