अंदमान, बंगाल आणि ओडिशात ‘मोचा’ चक्रीवादळाची चेतावणी !
नवी देहली – भारतीय हवामान खात्याने अंदमान-निकोबार, बंगाल आणि ओडिशा येथे ‘मोचा’ नावाच्या चक्रीवादळाची चेतावणी दिली आहे. मोचा चक्रीवादळामुळे पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक झाडे उन्मळून पडली.
A cyclonic storm is likely in Bay of Bengal on May 10 and it will move towards Bangladesh-Myanmar coasts said IMD on Monday #CycloneMocha #CycloneMochaUpdate #Odisha #kalingatv https://t.co/UKNAx8Xu4j
— Kalinga TV (@Kalingatv) May 8, 2023
या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता बंगालमधील दिघा येथे ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल’ अर्थात् ‘एन्.डी.आर्.एफ्.’ची ८ पथके आणि २०० बचाव कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासह १०० बचावकर्त्यांचा राखीव गटही सिद्ध ठेवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अनुमानानुसार १४ मे या दिवशी हे चक्रीवादळ उत्तर-ईशान्येकडे वळेल. हे वादळ बांगलादेशातील कॉक्स बाजार आणि म्यानमारच्या सिटवे शहराजवळ धडकण्याची शक्यता आहे. या वेळी ताशी १७५ किमी वेगाने वारे वाहील.
मासेमारांनी समुद्रात जाऊ नये ! – हवामान खाते
हवामान खात्याने मासेमारी करणार्यांना आणि जहाजांना १४ मे पर्यंत मध्य अन् ईशान्य बंगालच्या उपसागरात, तसेच उत्तर अंदमानाच्या समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वीच तेथे गेलेल्या जहाजांना किनार्यावर परतण्यास सांगण्यात आले आहे. ‘मोचा’मुळे १४ मे या दिवशी नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो.