संयुक्त शाहूपुरीच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज उत्सवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना !
कोल्हापूर – ४५ हून अधिक मंडळांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संयुक्त शाहूपुरी संघटनेच्या वतीने आयोजित छत्रपतीसंभाजी महाराज उत्सवात १२ मे या दिवशी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
या वेळी भव्य असे व्यासपीठ सिद्ध करण्यात आले असून त्यावर छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती विराजमान आहे. सायंकाळी गिरीष नार्वेकर यांच्या ‘शिवकालीन युद्धकालीन प्रशिक्षण संस्थे’मधील बालचमूंनी विविध युद्धकेलेचे प्रकार सादर करून इतिहासाचा जागर केला.
१३ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा होणार असून १४ मे या दिवशी दुपारी ३ वाजता भव्य मिरवणूक होणार आहे. शाहूपुरीतील युवकांकडून प्रेरणा घेऊन शहरातही विविध ठिकाणी अशा प्रकारे जयंती साजरी केली जाणार आहे.