आद्यपत्रकार देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता’ यावर व्याख्यान !

देवर्षी नारद

सांगली – विश्व संवाद केंद्र आणि ‘सत्यवेध माध्यम समूह’ यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यपत्रकार देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने पत्रकार आणि वार्ताहर यांच्यासाठी १३ मे या दिवशी सकाळी ११ वाजता विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ॲनालायझर न्यूज’चे श्री. सुशील कुलकर्णी हे ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता’ या विषयावर मार्गदर्शन करतील. हा कार्यक्रम राम मंदिराशेजारील ‘दि सांगली अर्बन बँके’च्या श्री. अण्णासाहेब गोडबोले सभागृहात होईल. तरी पत्रकार आणि माध्यमकर्मी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.