पिंपरी महापालिकेचा कर्मचारी ७ वर्षे कामावर अनुपस्थित !
पिंपरी – महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात काम करणारा कर्मचारी ७ वर्षे कामावर आला नाही. प्रशासनाने त्याला कामावरून काढून न टाकता वारंवार संधी देऊन पाठिशी घातले. प्रशासनाने पाठवलेल्या पत्रांना त्याने केराची टोपली दाखवली. अखेर ७ वर्षांनंतर पालिकेने त्याच्यावर कारवाई करत त्याला कामावरून काढून टाकले. ‘ह’ या क्षेत्रीय कार्यालयामध्ये हा प्रकार घडला. (एवढी वर्षे महापालिकेने कारवाईसाठी का वाट पाहिली ? पालिकेचे संबंधित अधिकारीही दोषी आहेत. – संपादक)