किशोर आवारे यांची तळेगाव येथे नगर परिषद कार्यालयासमोर हत्या !
पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा !
पुणे – येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव-दाभाडे नगर परिषद कार्यालयासमोर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. १२ मे या दिवशी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. किशोर आवारे हे त्यांच्या कामानिमित्त नगर परिषदेमध्ये आले होते. तेव्हा दबा धरून बसलेल्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले. त्यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले. दुपारी झालेल्या या हत्येमुळे शहरात तणाव पसरला असून परिसरातील दुकाने बंद करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून पोलिसांनी शहरातील बंदोबस्तात वाढ केली आहे.