अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे समीर वानखेडे यांच्या विरोधात भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा नोंद !
मुंबई – आंतरिक राजस्व सेवा (internal revenue service) अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सीबीआयने हा गुन्हा नोंद केला आहे. समीर वानखेडे यांच्या संबंधित ७ ठिकाणी सीबीआयने धाडी टाकल्या. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे चर्चेत आले होते. सीबीआयने त्यांच्या मुंबईतील घराची झडतीही घेतली. वानखेडे हे यापूर्वी अमली पदार्थविरोधी पथकाच्या मुंबई प्रभागचे प्रमुख होते.