(म्हणे) ‘द केरल स्टोरी’च्या दिग्दर्शकाचे डोळे काढणार्याला २१ लाख रुपये देऊ !’ – ‘हक-ए-हिंदुस्तान मोर्चा’ या धर्मांध संघटनेची घोषणा
बिहारमधील ‘हक-ए-हिंदुस्तान मोर्चा’ नावाच्या धर्मांध संघटनेची कायदाद्रोही घोषणा !
मुझफ्फरपूर (बिहार) – येथील ‘हक-ए-हिंदुस्तान मोर्चा’ या संघटनेने ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचे डोळे काढणार्याला २१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. या संघटनेचे अध्यक्ष तमन्ना हाशमी यांनी ही घोषणा केली आहे. येथे या संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी या चित्रपटाची भित्तीपत्रके जाळण्यात आली.
हाशमी म्हणाले की, या चित्रपटाच्या माध्यमातून मुसलमानांना अपकीर्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा चिथावणी देणारा चित्रपट असून यावर बिहारमध्ये बंदी घातली पाहिजे.
The Kerala Story: Haq-e-Hindustan’s Tamanna Hashmi issues threat, offers 21 lakhs to anyone who cuts the film Director Sudipto Sen’s eyes outhttps://t.co/kc5z86L5sx
— OpIndia.com (@OpIndia_com) May 12, 2023
संपादकीय भूमिकाबिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (संयुक्त) यांचे हिंदुद्वेषी सरकार असल्याने अशा संघटनेवर कोणतीही कारवाई होणार नाही, हे निश्चित ! |