पाकिस्तानी सैन्याने विष पाजून महंमद अली जिना यांना मारले ! – अल्ताफ हुसेन, एम्.क्यू.एम्. पक्ष
पाकिस्तानी राजकीय पक्षाचे प्रमुख अल्ताफ हुसेन यांचा आरोप !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानी सैन्याने महंमद अली जिना यांना त्यांच्या मार्गातून हटवले होते. त्यांना ‘स्लो पॉयझन’ (हळू हळू भिनणारे विष) देऊन त्यांना मारले. त्यानंतर त्यांचे उजवे हात मानले जाणारे लियाकत अली खान यांना एका कार्यक्रमात ठार केले. यानंतर फातिमा जिन्ना यांना ठार करण्यात आले, असा आरोप पाकिस्तानमधील ‘मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट’ (एम्.क्यू.एम्.) या पक्षाचे प्रमुख अल्ताफ हुसेन यांनी केला आहे. त्यांनी जर्मनीमध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा आरोप केला आहे. ‘सैन्याने वर्ष १९४७ नंतर नेहमीच पाकिस्तानवर नियंत्रण ठेवले आहे’, असेही त्यांनी सांगितले. अल्ताफ हुसेन यांच्यावर पाकमध्ये शेकडो गुन्हे नोंद असल्याने ते अनेक वर्षांपासून लंडन येथे रहात आहेत.
How Army & ISI dictate politics in Pakistan.
A part of my recent interview to @dw_urdu
Watch my interview on this link https://t.co/NUgpKmVX1h pic.twitter.com/JQCjdg2GLJ— Altaf Hussain (@AltafHussain_90) May 11, 2023
१. अल्ताफ हुसेन पुढे म्हणाले की, नवाझ शरीफ, बेनझीर भुट्टो, आसिफ अली झरदारी कुणाचीही सत्ता असो त्यांना आय.एस्.आय. आणि पाकच्या सैन्याच्या मुख्यालयात जाऊन झुकाने लागत होते. तसे न करता त्यांना कारभार चालवता येत नव्हता.
२. पाकिस्तानचे सैन्याधिकारी देशद्रोही आहेत. दुसर्याला देशद्रोही म्हणणारे सैन्यप्रमुख आहे. पाक सैन्याचे २ टक्के अधिकारी ७५ वर्षांपासून देशावर राज्य करत आहेत. ते स्वतःला अल्लाच्याही वर समजत आहेत. त्यांनी पाकिस्तानची वाईट स्थिती केली आहे. आता पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कृपेवर जगत आहे.