ऑस्ट्रेलियात खलिस्तानवादी संघटनेने आयोजित केलेला जनमत संग्रहाचा कार्यक्रम रहित !
मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी सिडनी येथे जनमत संग्रहाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम रहित करण्यात आला आहे.
Sydney’s Khalistan Referendum propaganda event by terror org Sikhs For Justice cancelled by Blacktown City Council: All you need to knowhttps://t.co/zXoFFmq26w
— OpIndia.com (@OpIndia_com) May 12, 2023
या जनमत कार्यक्रमाच्या विरोधात तेथील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे सुरक्षायंत्रणांच्या सांगण्यावरून हा कार्यक्रम रहित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम ब्लॅकटाऊन सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. ‘आमचे नियम आणि धोरणे यांमध्ये जनमत चाचणीचा कार्यक्रम बसत नसल्यामुळे हा कार्यक्रम रहित करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे’, असे ब्लॅकटाऊन सेंटरच्या व्यवस्थापन मंडळाने कळवले आहे.
संपादकीय भूमिकाऑस्ट्रेलिया सरकारने हा कार्यक्रम आयोजित करणार्या खलिस्तानवाद्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! |