युद्ध, हिंसाचार आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे वर्ष २०२२ मध्ये जगभरात ७ कोटी लोक विस्थापित ! – ‘अंतर्गत विस्थापन निरीक्षण केंद्र
नैसर्गिक आपत्तींमुळे भारतात २५ लाख लोक विस्थापित
जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – युद्ध, हिंसाचार आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे वर्ष २०२२ मध्ये ७ कोटी १० लाख लोक जगभरात विस्थापित झाल्याची माहिती ‘अंतर्गत विस्थापन निरीक्षण केंद्रा’च्या जागतिक अहवालात देण्यात आली आहे. यात भारतात नैसर्गिक आपत्तीमुळे २५ लाख लोक विस्थापित झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
War, natural disasters left record 71 million people internally displaced in 2022, report says https://t.co/yRF1ZLbnxN pic.twitter.com/JN7EUuGq2z
— CTV News (@CTVNews) May 11, 2023
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे मोठ्या प्रमाणात विस्थापन झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. वर्ष २०२१ च्या तुलनेत हे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक आहे.
पुरामुळे पाकिस्तान, नायजेरिया आणि ब्राझिल या देशांमध्ये सर्वाधिक विस्थापन झाले. सोमालिया, केनिया आणि इथियोपिया येथे दुष्काळामुळे विस्थापन झाले. वर्ष २०२१ च्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये विस्थापितांच्या संख्येत ४० टक्क्यांची वाढ झाली आहे.
संपादकीय भूमिकासंत आणि द्रष्टे यांनी सांगितल्यानुसार भविष्यात अशा प्रकारच्या संकटांमध्ये कोट्यवधी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. या काळात स्वतःचे रक्षण होण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे ! |