सूरत नगरपालिकेचे आश्रयगृह चालवणार्या इस्लामी न्यासाकडून हिंदु आश्रितांशी भेदभावपूर्ण वागणूक !
चौकशीनंतर न्यासाला पालिकेने टाकले काळ्या सूचीत !
सूरत (गुजरात) – येथील गोराट भागातील आश्रयगृहामध्ये असणार्या आश्रित हिंदूंशी भेदभावाची वागणूक केली जात असल्याने याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक केयूर चपटवाला यांनी केली आहे. हे आश्रयगृह ‘शाहिद मसीद मेडिकल सर्व्हेंट सोसायटी’ या न्यासाकडून चालवले जात आहे. त्यांच्याकडून हिंदु आश्रितांना वाईट वागणूक, तर मुसलमान आश्रितांना चांगली वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप नगरसेवक चपटवाला यांनी केला आहे. तसेच हिंदूंना आश्रयगृह सोडून जाण्यासाठी बाध्यही केले जाते, असे त्यांनी सांगितले. हे आश्रयगृह सूरत नगरपालिकेचे असून त्यांनी वरील न्यासाला चालवण्यास दिले आहे. शहरात अशी अनेक आश्रयगृहे पालिकाने उभारली आहेत आणि संस्थांना चालवण्यास दिली आहेत. नगरसेवक चपटवाला यांनी महापौर हेमाली बोघावाला यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर या न्यासाला काळ्या सूचीत टाकण्यात आले आहे.
सूरत नगर निगम ने बनाया शेल्टर होम, शाहिद मसीद सोसायटी को दिया चलाने: हिंदू को प्रताड़ना-मुस्लिमों पर कृपा, जाँच के बाद ब्लैक लिस्टेड#Gujarat https://t.co/z2dvLq2Mbe
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 11, 2023
महापौर हेमाली बोघावाला यांना तक्रार मिळाल्यानंतर त्यांनी अचानक या आश्रयगृहाला भेट दिली. त्या वेळी अनेक चुकीच्या गोष्टी चालू असल्याचे लक्षात आले. या न्यासाकडून आश्रयगृहाचे वीज देयक भरले नसल्याचेही आढळून आले. न्यासाकडून तेथे ३०० आश्रित रहात असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर महापौरांनी तेथील आश्रितांची सूची मागिल्यावर तेथे केवळ १०० जण लोक रहात असल्याचे आढळून आले.
संपादकीय भूमिकासामाजिक कार्याच्या नावाखालीही धर्मांधता जोपसणार्या लोकांना कारागृहात टाकले पाहिजे आणि अशांच्या संस्थांवर बंदी घातली पाहिजे ! |