माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे आणि निलंबन रहित !

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह

मुंबई – महाराष्ट्र सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये जारी केलेले निलंबन आदेशही मागे घेतला. ‘निलंबनाचा कालावधी ‘ऑन ड्युटी’ (कामावर उपस्थित) असल्याचे मानले जावे’, असे आदेशात म्हटले आहे.

परमबीर सिंह यांच्यावर खंडणी, भ्रष्टाचार असे आरोप होते. गैरव्यवहाराच्या अनेक प्रकरणांचा त्यांना सामना करावा लागला होता. अँटिलिया बाँब प्रकरणात कथित अनियमिततेमुळे त्यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आले होते. परमबीर सिंह यांच्यावरील या आरोपांची चौकशी करणार्‍या केंद्रीय अन्वेषण विभागाने पाच स्वतंत्र गुन्हे नोंदवले होते. हे गुन्हे यापूर्वी मुंबई पोलिसांनीही नोंदवले होते.