येत्या १४ मे या दिवशी तेलंगाणामध्ये हिंदु एकता यात्रेचे आयोजन

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार

भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांनी येत्या १४ मे या दिवशी करीमनगर येथे हिंदु एकता यात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगत या वेळी ‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील कलाकार आणि निर्मितीतील लोक यांचे स्वागत करण्यास उत्सूक असल्याचे म्हटले आहे. बंडी संजय कुमार यांनी ट्वीट करून या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा यांच्या ११ मे या दिवशी असलेल्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छाही दिल्या.

हिंदु एकता यात्रेमध्ये १ लाख लोक सहभागी होतील, अशी आशा संजय कुमार यांनी व्यक्त केली आहे. या यात्रेमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा सहभागी होणार आहेत.