तेलंगाणा येथे उपाहारगृहाच्या मुसलमान मालकाकडून हिंदु तरुणाला चपलाने मारहाण !
भाग्यनगर – बिर्यानी बनवणार्या उपाहारगृहाचा मालक असणार्या इम्रान याने सिलिंडरची वाहूक करणार्या हिंदु तरुणाला चपलाने मारहाण केली. पीडित तरुणाचे नाव लिंगम स्वामी असे आहे.
१. इम्रान याने गॅस सिलिंडरची मागणी केली होती. सिलिंडर ने-आण करणार्या लिंगम स्वामी याला उपाहारगृहाच्या ठिकाणी पोचायला विलंब झाला. त्या वेळी चिडलेल्या इम्रान याने स्वामी याला चपलाने मारले.
२. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना याची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोचले. अनेक संघटनांचे कार्यकर्ते लिंगम स्वामी याला समवेत घेऊन पोलीस ठाण्यात पोचले आणि त्यांनी इम्रान याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. लिंगम स्वामी याने इम्रान याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
तेलंगाणा येथे हिंदुद्वेषी भारत राष्ट्र समितीचे सरकार असल्यामुळे अशा उद्दाम मुसलमानांवर कारवाई होईल, याची शक्यता अल्प आहे ! |