सुवर्ण मंदिराच्या परिसरात झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणात ५ जणांना अटक
अमृतसर – शहरातील सुवर्ण मंदिराच्या परिसरात झालेल्या अल्प तीव्रतेच्या बाँबस्फोटांच्या प्रकरणात ५ जणांना अटक करण्यात आली आहे. याविषयी माहिती देतांना राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव म्हणाले की, अटक करण्यात आलेल्या ५ जणांना राज्यातील शांतता भंग करायची होती.
अमृतसर विस्फोट के साजिशकर्ताओं को गिरफ्तार किया गया है. धमाके के पीछे का मकसद शांति भंग करना था-#AmritsarBlast #PunjabPolice #Punjab https://t.co/awrEiVin41
— ABP News (@ABPNews) May 11, 2023
सुवर्ण मंदिराच्या परिसरात एका आठवड्यात ३ स्फोट झाले. ६ मे या दिवशी सुवर्ण मंदिराच्या जवळ असलेल्या हॅरिटेज स्ट्रीटच्या परिसरात स्फोट २ स्फोट झाले. ८ मे या दिवशी तिसरा स्फोट झाला.