चीनकडून कैलास मानसरोवर यात्रेचे शुल्क दुप्पट !
बीजिंग – चीनने कैलास मानसरोवर यात्रेसाठी शुल्क वाढवून ते दुप्पट केले आहे. तीन वर्षांपासून बंद असलेल्या कैलास मानसरोवर यात्रेसाठी चीनने व्हिसा द्यायला आरंभ केला आहे. यासह चीनने यात्रेसाठीचे विविध शुल्कही जवळपास दुप्पट केले आहे. इतकेच नव्हे, तर भाविकांनी स्वतःच्या साहाय्यासाठी नेपाळहून कामगार किंवा मदतनीस समवेत घेतल्यास ३०० डॉलर, म्हणजे अनुमाने २४ सहस्र रुपये जादा द्यावे लागणार आहेत. या शुल्काला ‘ग्रास डॅमेजिंग फी’ असे म्हटले आहे. यात्रेदरम्यान कैलास पर्वताच्या परिसरातील गवताची हानी होते, असा चीनचा कयास असून त्याची भरपाई यात्रेकरूंकडूनच केली जाणार आहे.
(सौजन्य : TIMES NOW Navbharat)
चीनकडून यात्रेकरूंसाठी नवे नियम !
चीनने यात्रेकरूंसाठी काही नवे नियमही सिद्ध केले आहेत. त्यांनुसार आता प्रत्येक यात्रेकरूला काठमांडू तळावरच स्वतःचे ‘युनिक आयडेंटिफेशन’ (संगणकाद्वारे स्वतःची ओळख पटवणे) करावे लागेल. यासाठी बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांचे ‘स्कॅनिंग’ केले जाणार आहे.
भारतीय यात्रेकरूंची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी चीनकडून नवे नियम !- नेपाळ
नेपाळी पर्यटन व्यवसायिकांचे म्हणणे आहे की, चीनने हे गुंतागुंतीचे नियम परदेशी विशेषत: भारतीय यात्रेकरूंची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी सिद्ध केले आहेत. ‘द काठमांडू पोस्ट’नुसार, नेपाळच्या तीन प्रमुख पर्यटन व्याससायिकांनी हे नवे नियम मागे घेण्याची मागणी चिनी राजदूत चेन सांग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संपादकीय भूमिकाहा चीनचा हिंदुद्वेष असून सरकारने तात्काळ याचा निषेध करून हे वाढीव शुल्क रहित करण्यासाठी चीनवर दबाव आणला पाहिजे ! |