अस्थिर पाकिस्तान भारतासाठी धोकादायक !

फारूख अब्दुल्ला यांचे पाकधार्जिणे विधान

फारूख अब्दुल्ला

नवी देहली – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेवरून पाकमध्ये हिंसाचार आणि निदर्शने चालू आहेत. संपूर्ण देशात अस्थिरता आहे. या पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाकिस्तानचा एक कपटी इतिहास आहे; मात्र अस्थिर पाकिस्तान भारतासाठी धोकादायक आहे. पाकमध्ये स्थैर्य असणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. (पाकने कपटीपणाणे बळकावलेला काश्मीरचा भाग परत भारतात विलीन करणे, हे पाकमधील स्थैर्यासाठी महत्त्वाचे आहे, असे विधान फारूख अब्दुल्ला करतील का ? – संपादक)

फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानातील सध्याच्या परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. पाकिस्तानची अर्थव्यवस्था घसरत चालली आहे. बलुचिस्तानमध्ये पुरामुळे मोठी हानी झाली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला स्थिरतेची नितांत गरज आहे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

प्रत्येक वेळी पाकप्रेमाचा इतका उमाळा येणार्‍यांना सरकार पाकमध्ये हाकलून का देत नाही ?