दुर्गाडी गडावरील अनधिकृत बांधकामासह मुसलमानांनी गडालाही फासला हिरवा-पांढरा रंग !
अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याऐवजी त्याचा व्हिडिओ प्रसारित न करण्यासाठी पोलिसांकडून दबाव !
ठाणे, १० मे (वार्ता.) – कल्याण येथील दुर्गाडी गडावरील कथित ‘ईदगाह’च्या (नमाजपठणासाठीच्या) अनधिकृत बांधकामाला मुसलमानांनी हिरवा आणि पांढरा रंग फासला आहे. एवढ्यावरच न थांबता गडावर जाण्यासाठी असलेल्या पायर्या, झाडे, दगड आणि अन्य बांधकाम यांनाही रंग फासण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातीलच मलंगगडावर भगवा ध्वज लावण्यासाठी गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांवर पोलिसांनी तडीपार करण्याची कारवाई केली होती; मात्र हिंदूंचे धार्मिक स्थान असलेल्या दुर्गाडी गडावर कोणत्याही प्रकारे मालकी हक्क नसतांना मुसलमानांनी हिरवा रंग फासल्यावरही कारवाई करण्याऐवजी हा प्रकार लपवण्यासाठी पोलीस हिंदुत्वनिष्ठांवर दबाव आणत आहेत.
संपादकीय भूमिका
|
व्हिडिओमुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची पोलिसांना भीती !
या गडाची मालकी वंशपरंपरागत शालीवाहन राजांच्या वंशजांकडे आहे. असे असतांना एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या ईदच्या आधी मुसलमानांनी दुर्गाडी गडावर ही रंगरंगोटी केली. याचा व्हिडिओ काहींनी काढला असून ‘हा व्हिडिओ प्रसारित करू नये’, यासाठी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस हिंदुत्वनिष्ठांवर दबाव आणत आहेत. (अन्य धर्मियांच्या संदर्भात असा दबाव आणण्याचे पोलिसांचे धारिष्ट्य होत नाही ! – संपादक)
यामध्ये गंभीर गोष्ट म्हणजे येथील पोलीस आणि प्रशासन गडावरील अवैध बांधकाम हटवण्याऐवजी ईदच्या दिवशी गडावरील मंदिरात पूजेला आडकाठी करत आहेत. (हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस धर्मांधांसमोर नेहमीच नांगी टाकतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) मागील अनेक वर्षे हा प्रकार हिंदू सहन करत आहेत. (हिंदूंनो, आणखी किती काळ तुम्ही सहन करत बसणार ? – संपादक)
संपादकीय भूमिकाअन्य धर्मियांकडून अनेकदा निर्माण करण्यात येणार्या धार्मिक तेढविषयी पोलीस कधी बोलणार ? |
अवैध बांधकामाला ‘ईदगाह’ ठरवून पोलीस आणि प्रशासन यांनी परिस्थिती संवेदनशील बनवली !
गडावरील अवैध बांधकाम ‘ईदगाह’ असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मुसलमानांना देता आलेला नाही. उलट हे अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि कल्याणचे पोलीस उपायुक्त यांना दिला आहे. असे असतांना पोलीस आणि प्रशासन पत्रव्यवहार करतांना या अवैध बांधकामाचा उल्लेख जाणीवपूर्वक ‘ईदगाह’ असा करतात. अशा प्रकारे या अवैध बांधकामाला एकप्रकारे पोलीस आणि प्रशासन यांनी धार्मिक स्थळाचे स्वरूप देऊन हा विषय संवेदनशील बनवला आहे.
अनधिकृत बांधकामावरून गडाच्या बाजूच्या रस्त्याचे ‘ईदगाह रोड’ असे नामकरण !
दुर्गाडी गडाच्या बाजूच्या रस्त्याला चक्क गडावरील अवैध बांधकामावरून ‘ईदगाह रोड’ असे नाव देण्यात आले आहे. स्थानिक नगरसेवक कासिफ ईमान महंमद तनकी यांच्या नावाने हा फलक रस्त्यावर अवैधरित्या लावण्यात आला आहे. यावरही पोलीस आणि प्रशासन यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
दुर्गाडी गडाच्या इस्लामीकरणाचे नियोजित षड्यंत्र !दुर्गाडी गडावरील दुर्गादेवीचे मंदिर हे मशीद असल्याचा दावा करत त्याचा मालकी हक्क वक्फ मंडळाकडे देण्याची मागणी करणे, गडावरील अनधिकृत बांधकाम ‘ईदगाह’ असल्याचा दावा करत तेथे नमाजपठण चालू करणे, गडाच्या बाजूच्या रस्त्याचे नामकरण ‘ईदगाह रोड’ म्हणून करणे, शासकीय कागदपत्रांवर अनधिकृत बांधकामाचा उल्लेख ‘ईदगाह’ म्हणून करणे हे सर्व दुर्गाडी गडाच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र अगदी नियोजनबद्ध चालू असून पोलीस अन् प्रशासन हेही त्याला सहकार्य करत आहेत. |