उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांचा ‘संत आणि साधक’ यांच्याप्रतीचा ‘सेवाभाव’ व्यक्त करणारा एक प्रसंग !
‘९.४.२०२३ या दिवशी उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांची मी भेट घेतली. वर्ष १९९६ पासून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते ज्योतिष विषयाचा अभ्यास करत आहेत. त्यांना मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एक छायाचित्र दाखवले. ते पाहून त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची काही आध्यात्मिक वैशिष्ट्ये सांगितली. भेटीच्या शेवटी श्री. जयतीर्थ यांना मी काही दक्षिणा देऊ लागलो. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘संत आणि साधक यांचे भविष्य पहातांना मी दक्षिणा घेत नाही. तुम्ही हे पैसे सनातन संस्थेला अर्पण करा.’’ यावरून मला त्यांच्यातील ‘सेवाभाव’ हा गुण प्रकर्षाने लक्षात आला.’
– श्री. सोमनाथ मल्ल्या, उडुपी, कर्नाटक. (१७.४.२०२३)