‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रत्येक हिंदु तरुणीने पहावा ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह
भोपाळ (मध्यप्रदेश) – ‘लव्ह जिहाद’च्या नावे तरुणींची फसवणूक केली जाते. त्यांना त्यामध्ये अडकवले जाते. त्यानंतर त्यांच्या समवेत घडणार्या घटना या भयंकर असतात. ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट प्रत्येक मुलीने, तरुणीने आणि महिलेने पाहिला पाहिजे. त्यामुळे त्या स्वतःचे अशा गोष्टींपासून संरक्षण करू शकतील, तसेच कुटुंबाचे आणि मुलांचेही रक्षण करू शकतील, अशी प्रतिक्रिया येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी व्यक्त केली.
सौजन्य : Zee Hindustan
साध्वी प्रज्ञा सिंह पुढे म्हणाल्या की, ‘द केरल स्टोरी’मध्ये जे दाखवण्यात आले आहे, ते केवळ केरळमध्ये घडत नाही, तर भोपाळमध्येही घडत आहेत. आमच्याकडे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. मी याआधीही यावर भाष्य केले आहे. आतंकवादाचे षड्यंत्र लव्ह जिहादच्या माध्यमातून पेरले जाते आहे. भारताच्या विरोधात त्यांना उभे करण्याचे षड्यंत्र केले जात आहे. भारतातील गद्दारांकडून अशा गोष्टींना संरक्षण दिले जाते. केवळ हिंदु मुलींनाच नाही, तर मुलांनाही लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवले जाते. त्यांना आतंकवादात ढकलले जाते. हिंदु मुली आणि मुले यांचे धर्मांतर केले जाते.