गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘स्मरण’, ‘स्तवन’, ‘नमन’ आणि ‘भजन’, हाच साधकांच्या उद्धाराचा एकमेव मार्ग !
‘श्रीमत्परब्रह्म गुरुं स्मरामि
श्रीमत्परब्रह्म गुरुं वदामि ।
श्रीमत्परब्रह्म गुरुं नमामि
श्रीमत्परब्रह्म गुरुं भजामि ।।
– गुरुगीता, श्लोक ८८
अर्थ : श्रीमत् परब्रह्म गुरूंचे मी स्मरण करतो. श्रीमत् परब्रह्म गुरूंचे मी स्तवन करतो. श्रीमत् परब्रह्म गुरूंना मी नमन करतो आणि श्रीमत् परब्रह्म गुरूंचे मी भजन करतो.
भावार्थ : सनातनच्या साधकांच्या जीवनात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अवतरित झाले आणि तेच साधकांचे सर्वस्व बनले; म्हणून साधकांनो, श्रीमत् परब्रह्मस्वरूप गुरुदेवांचेच अखंड स्मरण करूया ! श्रीमत् परब्रह्मस्वरूप गुरुदेवांच्या दैवी अवतारी कार्याचे आणि त्यांच्या विविध गुणांचे अखंड स्तवन करूया ! श्रीमत् परब्रह्मस्वरूप गुरुदेवांच्या दैवी अवतारी रूपाला प्रत्येक क्षणी नमन करूया ! श्रीमत् परब्रह्मस्वरूप गुरुदेवांनी शिकवलेली साधना करून त्या साधनेच्या प्रयत्नांद्वारे त्यांचे भजन, म्हणजे आराधना करूया. हाच आपल्या उद्धाराचा एकमेव अनमोल मार्ग आहे.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (११.५.२०२३)