(म्‍हणे) ‘देशाला अपकीर्त करणार्‍या ‘द केरल स्‍टोरी’ या चित्रपटाच्‍या निर्मात्‍याला फाशी द्या !’

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांचे राष्‍ट्रद्वेषी आणि समाजद्रोही विधान !

 

( सौजन्य : kreately )

ठाणे – ‘द केरल स्‍टोरी’ या चित्रपटाने जगभरात भारताची अपकीर्ती केली असून देशात धार्मिक विद्वेष पसरवणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्‍हा नोंद केला पाहिजे.


देशात अराजकता माजवण्‍यार्‍या आणि देशाला अपकीर्त करणार्‍या या चित्रपटाच्‍या निर्मात्‍याला फाशी द्यायला हवी, असे फुकाचे विधान राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी केले होते; पण यामुळे वादंग निर्माण झाल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘माझ्‍या विधानाचा शब्‍दशः अर्थ घेऊन अनर्थ करण्‍यात आला. (लोकप्रतिनिधींची नेहमीची कोलांटीउडी ! – संपादक) एका वाक्‍यावर वाद निर्माण करायचा, असे प्रकार घडत आहेत. या चित्रपटाने देशाची अपकीर्ती केली आहे, याची नोंद कुणीच घेतली नाही. माझे हे विधान म्‍हणजे संतापाचा कडेलोट होता. माझ्‍याकडून व्‍यक्‍त झालेला शाब्‍द़िक संताप होता.’’ (हा शाब्‍द़िक संताप नव्‍हे, तर चित्रपटाद्वारे मुसलमानांच्‍या षड्‍यंत्रासह स्‍वतःचेही पितळ उघडे पडत असल्‍याने व्‍यक्‍त झालेला हा विद्वेषच होय ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदूंनी हिंदुविरोधी चित्रपटांना विरोध केल्‍यावर ‘मग तुम्‍ही चित्रपट पाहू नका’, असा उद्दाम सल्ला देणारे आता हिंदु धर्मावरील आघाताला वाचा फोडणार्‍या चित्रपट निर्मात्‍याला फाशी देण्‍याची मागणी करतात, हा पराकोटीचा हिंदुद्वेष ! 
  • पराकोटीचा हिंदुद्वेष जोपासणार्‍या लोकप्रतिनिधींना निवडून देणे हिंदूंना लज्‍जास्‍पद ! असे नेते लोकशाहीला कलंक !