परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या ‘श्री गुरु दिव्यदर्शन’ सोहळ्याच्या वेळी केरळ येथील जिज्ञासू, हितचिंतक आणि साधक यांना आलेल्या अनुभूती
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव म्हणजे साधकांना भरभरून चैतन्य आणि आनंद मिळण्याची महापर्वणी ! २.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे या सोहळ्याचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण करण्यात आले. या ‘ऑनलाईन’ भावसोहळ्यात परात्पर गुरु डॉक्टरांच्या पूर्वी झालेल्या विष्णुरूपातील ‘डोलोत्सव’ (झोपाळ्यावर बसवून स्तुती करणे) याविषयीची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.
हा भावसोहळा पहातांना केरळ येथील धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, जिज्ञासू आणि साधक यांना आलेल्या काही अनुभूती ९ मे या दिवशी पाहिल्या. उर्वरित अनुभूती पुढे दिल्या आहेत.
८. श्रीमती सौदामिनी कैमल (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६९ टक्के आणि वय ८० वर्षे), कोची
८ अ. ‘भावसोहळ्याच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होणार’, असे वाटून मन आनंदी होणे : ‘२ मे या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा आहे’, हे समजल्यावर माझे मन आनंदी आणि उत्साही झाले. या वयात मला गोवा येथे रामनाथी आश्रमात जाऊन परात्पर गुरुदेवांना भेटणे शक्य नाही; पण ‘इथेच बसून मला त्यांचे दर्शन होणार’, असे वाटून पुष्कळ कृतज्ञता वाटली.
८ आ. सोहळ्याच्या दिवशी सकाळी आरतीच्या वेळी परात्पर गुरुमाऊलीचे श्रीकृष्णरूपात दर्शन होणे : सोहळ्याच्या आदल्या दिवशीपासूनच माझी प्रार्थना आणि गुरुस्मरण चालू होते. सोहळ्याच्या दिवशी सकाळी केरळ येथील सेवाकेंद्रातील आरतीच्या वेळी मला परात्पर गुरुमाऊलीचे श्रीकृष्णरूपात दर्शन झाले. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि माझा शरणागतभाव जागृत झाला.
८ इ. सद्गुरुद्वयी परात्पर गुरु डॉक्टरांचा झुला झुलवत असतांना झुल्यावर दिव्य अन् तेजस्वी बालकाचे दर्शन होणे : सद्गुरुद्वयी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) परात्पर गुरु डॉक्टरांचा झुला झुलवत असतांना मला कृष्णजन्माची आठवण झाली आणि झुल्यावर दिव्य अन् तेजस्वी बालकाचे दर्शन झाले. त्या वेळी ‘आम्ही सर्व साधक रामनाथी आश्रमात त्यांच्या चरणांशीच बसलो आहोत’, असे मला जाणवले.
८ ई. सद्गुरुद्वयी परात्पर गुरुदेवांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करत असतांना मला भावाश्रू अनावर झाले.
८ उ. बालसाधिका नृत्यसेवा सादर करत असतांना ‘मी वैकुंठात आहे’, असे अनुभवले आणि त्या वेळी परात्पर गुरुदेवांचा आनंद बघून मला भावाश्रू आले.
८ ऊ. सलग ५ घंटे एका जागी बसूनही शारीरिक त्रास न होणे : इतर वेळी मी एका जागी पुष्कळ वेळ बसून राहिल्यावर मला शारीरिक त्रास होतो; पण या सोहळ्यापूर्वी आणि सोहळा संपेपर्यंत मी एकूण ५ घंटे बसून होते, तरी मला कोणताही त्रास झाला नाही.
तिन्ही मोक्षगुरूंनी ‘याची देही, याची डोळा’ हा सोहळा बघण्याची संधी दिली. त्याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
९. श्री. साईदीपक, थिरूवनंतपूरम्
९ अ. सोहळा पाहिल्यानंतर ‘साधनेचे प्रयत्न वाढवायला हवेत’, याची जाणीव होणे : ‘सोहळा पाहिल्यानंतर मला ‘साधनेचे प्रयत्न वाढवायला हवेत’, याची जाणीव झाली. ‘तिन्ही मोक्षगुरूंना (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) स्वतःच्या हृदयात ठेवायला हवे आणि कोणतीही कृती करण्यापूर्वी परात्पर गुरुदेवांना विचारून ती करायला हवी’, याची मला जाणीव झाली. ‘परात्पर गुरुदेव स्वतः मार्गदर्शन करत आहेत आणि माझ्यावर त्यांची कृपा होत आहे’, याची जाणीव होऊन कृतज्ञता वाटली.’
१०. कु. रश्मी परमेश्वरन् (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६४ टक्के आणि वय ४६ वर्षे), कोची
१० अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर मन हलके होणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर माझे मन पुष्कळ हलके झाले. ‘माझ्याकडून गुरुदेवांना अपेक्षित असे प्रयत्न होत नाहीत’, याची जाणीव होऊन त्यांच्या चरणी शरणागतीने प्रार्थना चालू झाली. बालसाधिका नृत्य करत असतांना ‘तिच्या ठिकाणी मीच श्री गुरुचरणी समर्पित होत आहे’, असे वाटून माझी भावजागृती झाली.’
(सर्व सूत्रांचा दिनांक ३.५.२०२१)
(समाप्त)