साधनेचा प्रसार करण्यासाठी कठोर परिश्रम घेणारे आणि अद्वितीय संशोधनकार्य करणारे प.पू. डॉ. आठवले !
प.पू. डॉ. आठवले यांना ८१ व्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
१. प.पू. डॉ. आठवले यांचे कार्य संपूर्ण जगभर पसरले असणे
‘गोवा येथे स्थित सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले हे मानवी रूपातील दैवी अवतार आहेत. त्यांचे आपल्या मातृभूमीवर, म्हणजेच भारत देशावर निस्सीम प्रेम आहे. सनातन संस्थेचे मुख्यालय गोवा येथे असले, तरी प.पू. डॉ. आठवले यांचे अध्यात्मप्रसार आणि धर्मरक्षण यांचे कार्य संपूर्ण जगभर पसरले आहे.
२. ‘साधकांची साधना होत आहे ना ?’, याकडे प.पू. आठवले यांचे लक्ष असणे
सनातन संस्थेचा मुख्य साधनामार्ग म्हणजे नामजप होय. सनातनचे साधक प्रतिदिन नामजप साधना करतात आणि वेळोवेळी त्याचा आढावा उत्तरदायी साधकांना देतात. ‘साधकांचा नामजप होत आहे ना ?’, याकडे प.पू. डॉ. आठवले स्वतः लक्ष देतात. ‘सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या प्रत्येक साधकाचा पुढच्या पुढच्या टप्प्याचा नामजप होत आहे ना ?, तसेच त्याची आध्यात्मिक उन्नती होऊन त्याची आध्यात्मिक वाटचाल उच्च लोकांच्या दिशेने होत आहे ना ?’, या दृष्टीने साधकांना घडवले जाते.
३. आध्यात्मिक क्षेत्रातील प्रत्येक विषयाचे संशोधन, हे सनातनचे वैशिष्ट्य असणे
सनातन संस्थेमधील आणखी एक पैलू म्हणजे, ते करत असलेले अध्यात्मिक क्षेत्रातील प्रत्येक विषयाचे संशोधन ! संस्थेने स्वतःचे आध्यात्मिक मार्गदर्शक आणि संशोधक सिद्ध केले आहेत, जे प्राचीन सनातन धर्माची पुनर्स्थापना अन् अद्वितीय हिंदु राष्ट्र स्थापन होण्याच्या दृष्टीने अहोरात्र झटत आहेत.
४. सनातनमध्ये साधकांना धर्माचरण करण्याचे महत्त्व सांगितले जाणे
सनातन संस्था साधकांना धर्माचरण करण्याचे महत्त्व सांगून ते करण्यास प्रवृत्त करते. येथे साधकांना आपत्काळाला सामोरे जाण्याच्या दृष्टीने, तसेच संकटकाळात रक्षण होण्याच्या दृष्टीने प्रशिक्षित केले जाते. संस्थेने ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी करावयाची सिद्धता’, या विषयावर काही मार्गदर्शक ग्रंथही प्रकाशित केले आहेत.
५. प.पू. डॉ. आठवले यांचे संशोधन कार्य आणि कठोर परिश्रम अद्वितीय असणे
प.पू. डॉ. आठवले हे इंदूर, मध्यप्रदेश येथील संत प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य आहेत. प.पू. भक्तराज महाराज यांनी केलेल्या आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे प.पू. डॉक्टरांनी विविध आध्यात्मिक संस्थांची स्थापना केली. प.पू. डॉ. आठवले यांचे संशोधन कार्य आणि कठोर परिश्रम अद्वितीय आहे.