चांगले प्रयत्न करणार्यांना प्रोत्साहन देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
दूरचित्रवाणीवरील ‘महाभारत’ या सुप्रसिद्ध मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे सौरभ राज जैन हे पत्नी रिद्धीमा आणि अन्य कुटुंबीय यांच्यासह सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटले. त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना अध्यात्माविषयी निरनिराळे प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले. सौरभ राज जैन यांचे अभिनयाच्या माध्यमातून ईश्वरापर्यंत पोचण्याच्या दृष्टीने चालू असलेले प्रयत्न पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी त्यांचे कौतुक केले.