देवद (पनवेल) येथे श्री गणपति, श्री स्वामी समर्थ आणि श्री साईबाबा यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा !
देवद (पनवेल) – १२ मे या दिवशी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ स्वामी समर्थ अपार्टमेंटसमोर श्री गणपति, श्री स्वामी समर्थ आणि श्री साईबाबा यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने १० मे या दिवशी दुपारी ३ ते ४.३० या वेळेत नामजप मंत्रघोष होईल. त्यानंतर शोभायात्रा होईल. ११ मे या दिवशीही दुपारी ४ ते रात्री ८.३० पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात विविध धार्मिक विधी, सामुदायिक हरिपाठ, भजन आदी कार्यक्रम होतील. १२ मे या दिवशी पहाटे ५.३० पासून धार्मिक विधींना आरंभ होऊन सकाळी १० वाजता पूर्णाहुती होईल. सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत तिन्ही मूर्तींची प्राणप्रतिष्ठा, तसेच ध्वजारोहण आणि कळसारोहण होईल. १ वाजता महाप्रसाद होईल. दुपारी ३ ते ४ या वेळेत नामजप आणि मंत्रघोष होईल. संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत सामुदायिक हरिपाठ होईल. रात्री ८ वाजता भक्तीगीतांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.