पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी राजेंद्र शेळके !
पंढरपूर – येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी उपजिल्हाधिकारी राजेंद्र शेळके यांची ३ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील वर्षी विठ्ठल जोशी यांचे पुणे येथे स्थानांतर झाल्यावर प्रांताधिकारी गजानन गुरव आणि त्यांच्यानंतर अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे हे प्रभारी म्हणून काम पहात होते. शेळके हे नांदेड येथील उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.