देहू देवस्थान संस्थानने केली पालखी मार्गाची पहाणी !
देहूगाव (पुणे) – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १० जून २०२३ या दिवशी प्रस्थान होणार आहे. त्या दृष्टीने देहू संस्थांनचे अध्यक्ष, पालखी सोहळा प्रमुख आदींनी संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची तीन टप्प्यांत (पालखी विसावा, पालखी सोहळा मुक्काम स्थळ आणि पालखी मार्ग) पहाणी केली. अकलूजचे तहसीलदार पहाणीच्या वेळी देहू संस्थानच्या विश्वस्तांसमवेत होते. या वर्षी उन्हाळा कडक असल्याने पाण्याच्या टँकरची संख्या वाढवावी, पुरेशी औषधे उपलब्ध करावी, तसेच फिरत्या शौचालयांची संख्या वाढवावी, अशी मागणी देहू देवस्थान संस्थानने पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना केली.