भारतीय जनता पक्षाला पर्याय देण्याच्या प्रयत्नात माझाही सहभाग असेल ! – शरद पवार
बारामती – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एकजूट होत असतांना मी बाजूला होणे योग्य नाही. त्यामुळे मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय मागे घेतला, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. भाजपला पर्याय देण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नात माझा सहभाग असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनेक मान्यवरांच्या मतांचा आदर राखून मी हा निर्णय घेतला असे पवार यांनी सांगितले. कोणताही एक राजकीय पक्ष देशात पर्याय उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यामुळे अनेक पक्षांनी एकत्र येण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणावी लागेल. निवडणुकीच्या आधी भाजपला पर्याय उभा करता आला, तर त्याची अधिक आवश्यकता आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.