धर्मामध्ये जातीभेद नसून वर्णरूपी सामाजिक व्यवस्था असणे !
‘आमच्या भारत देशात जातीभेदाच्या विरुद्ध पुष्कळ अपप्रचार करण्यात आला आहे; परंतु हा अपप्रचार जेवढा वाढत गेला, तेवढ्या प्रमाणात जातीभेदाची बेडी दृढ होत गेली. जातीभेदाची उत्पत्ती आणि प्रचार अधिकतर राजकीय पक्ष अन् सरकार यांनी भारतियांमध्ये फूट पाडण्यासाठी केली आणि आपला स्वार्थ साधून घेतला.
प्रत्येक व्यक्तीमध्ये ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र यांचा अंश असतो. त्यासाठी आपण मनुष्याचे दैनंदिन जीवन पाहूया.
१. जेव्हा तो अर्थप्राप्तीसाठी एखादी सेवा (स्वच्छतेची सेवा इत्यादी) करत असेल, तर तो ‘शूद्र’ वर्णाचा होतो.
२. जेव्हा मनुष्य स्वतः आपल्या लाभासाठी काही विकत घेणे वा विक्री करत असेल, तर त्याला ‘वैश्य’ वर्णाची संज्ञा दिली जाते.
३. जेव्हा मनुष्य अन्यायाच्या विरुद्ध शस्त्र आणि शास्त्र उचलतो, तेव्हा त्याला ‘क्षत्रियाची’ संज्ञा दिली जाते.
४. जेव्हा मनुष्य स्वतःच्या मोक्षप्राप्तीसाठी ईश्वर चिंतन करू लागतो, भगवंताचे कीर्तन करतो, तेव्हा त्याला ‘ब्राह्मण’ वर्णाची संज्ञा दिली जाते.
हे स्पष्ट आहे की, प्रत्येक मनुष्याचा वरील ४ वर्णांमध्ये समावेश असतो, तर एक दुसर्यामध्ये भेदभाव का करावा ?
माझ्या विचाराने जातीपातीवरून कोणत्याही वर्णाला वेगळे समजले जाऊ नये; कारण की, हा एक सामाजिक नियम आहे आणि प्रत्येकाचे गुण अन् कर्म यांच्या भेदावर ते आधारित आहेत.
अ. ब्राह्मणाचे स्वरूप : गळ्यापर्यंत म्हणजे ईश्वर चिंतन योग असतो. शरिराच्या सर्व अंगांचे नियंत्रण, म्हणजे शरीररूपी समाजाला नियंत्रणात ठेवून चालवणे.
आ. क्षत्रियाचे स्वरूप : हात आणि खांदे यांनी रक्षणाचे दायित्व घेणे, प्रत्येक आक्रमण सहन करून प्रतिकार करणे आणि प्रत्येक कार्य संपादित करणे.
इ. वैश्याचे स्वरूप : पोट भरण्यासाठी वस्तू विकत घेणे-विकणे याचे कार्य करणे, शरिरासाठी भोजन पचन करणे आणि शक्ती मिळवणे.
ई. शूद्राचे स्वरूप : शरिराच्या दृष्टीने पाय तसे आहेत. दैनंदिन जीवनात सर्व काही वाहून नेणे, हे त्याचे कार्य असते. मग तेथे रस्ता किंवा चिखल, डोंगर काही असो थांबायचे नाही.
– श्री. रामगोपाल
(साभार : मासिक ‘अक्षर प्रभात’, जानेवारी २०२०)