गोहत्या करणार्या दौंड (पुणे) येथील टोळीवर तडीपारीची कारवाई, ७ धर्मांध तडीपार !
दौंड (जिल्हा पुणे) – दौंड शहर आणि परिसरात गोहत्या करून गोमांसाची वाहतूक आणि विक्री करणार्या टोळीतील ७ सदस्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अंकित गोयल यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी टोळीचा प्रमुख अश्पाक उपाख्य लाला कुरेशी याच्यासह आसिफ कुरेशी, वाजीद कुरेशी, कय्युम कुरेशी, इमरान कुरेशी, इद्रिस कुरेशी आणि तन्वीर कुरेशी यांना ६ मे २०२३ पासून एका वर्षासाठी तडीपार केले आहे. या टोळीला पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस परिसर यांसह नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि कर्जत तालुका परिसरातून तडीपार करण्यात आले आहे. टोळीकडून गोहत्या, गोवंश हत्या करून मांसाची वाहतूक आणि विक्री सातत्याने केली जात होती. पोलिसांना संशय येऊ नये, यासाठी टोळीकडून गोमांस वाहतुकीसाठी ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल’ (एस्.यू.व्ही.) वाहनांचा वापर केला जात होता.
संपादकीय भूमिका
|