छत्रपती संभाजीनगर येथे बनावट आधुनिक वैद्य मोहसीन खान याच्याकडून वैद्यकीय अधिकार्यांना जिवे मारण्याची धमकी !
छत्रपती संभाजीनगर – खोट्या कागदपत्रांच्या आधारे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणारा बनावट आधुनिक वैद्य मोहसीन खान याला काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने निलंबित केले होते; मात्र त्याने उपसंचालक, आरोग्य सेवा कार्यालयात घुसून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांना दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच कार्यालयातील कागदपत्रे फेकून दिली. या प्रकरणी आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी मोहसीन खान याच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे, तसेच पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्य असणारे धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे पुन:पुन्हा सिद्ध होते. – संपादक)
४ जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकार्यांची डॉ. एकनाथ माले यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवा इमारतीत बैठक चालू होती. त्या वेळी मोहसीन तिथे आला. त्याने माहितीच्या अधिकारात कंत्राटाविषयी माहिती मागितली होती. ‘मला न्यायालयात त्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. माहिती दिली नाही, तर तुला पाहून घेईन. ३८ सहस्र रुपयांच्या नोकरीला मी लाथ मारतो’, असे म्हणत त्याने शेळके यांच्या पटलावरील कागदपत्रे आणि धारिका फेकून सरकारी कामात अडथळा आणला. ‘माझ्याकडे साडेबारा कोटींचा बंगला आहे, गाडी आहे, मला नोकरीची आवश्यकता नाही’, असे त्याने सांगितले’, असे तक्रारीत म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांधाने प्रशासकीय इमारतीत घुसून अधिकार्याला उघडपणे दमदाटी करणे हे कायदा-सुव्यस्थेचा धाक नसल्याचे लक्षण ! |