कल्याण येथील दुर्गाडी गडावरील मुसलमानांच्या अतिक्रमणाला पोलीस आणि महानगरपालिका यांच्याकडून पाठराखण !
|
ठाणे, ९ मे (वार्ता.) – कल्याण येथील दुर्गाडी गडावर मुसलमानांनी केलेले अतिक्रमण पाडून टाका, असा स्पष्ट आदेश ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आला आहे. त्यावर कार्यवाही करण्याचे सोडून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि वरिष्ठ पोलीस या अनधिकृत बांधकामाला पाठीशी घालत आहेत. अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही करण्याऐवजी ती हटवण्याची मागणी करणार्यांनाच पोलीस दमदाटी करत असल्याचा धक्कादायक प्रकार चालू आहे. (गडप्रेमींना दमदाटी करणारे पोलीस छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात असणे संतापजनक ! – संपादक)
दुर्गाडी गडावर मुसलमानांनी केलेले अतिक्रमण हटवण्यात यावे, असा स्पष्ट आदेश २३ डिसेंबर २०२२ या दिवशी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, कल्याणचे पोलीस उपायुक्त आणि तहसीलदार यांना देण्यात आला आहे. या आदेशाची प्रतही दैनिक ‘सनातन प्रभात’ला प्राप्त झाली आहे. या पत्रामध्ये दुर्गाडी गडावर वंशपरंपरागत सातवाहन राजांचे वंशज आणि वारसदार यांचा मालकी हक्क आहे. त्यामुळे ‘तेथे असलेले मुसलमानांचे अतिक्रमण हटवण्यात यावे’, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत; मात्र ४ मासांनंतरही पोलीस आणि प्रशासन या अतिक्रमणावर कारवाई करायला सिद्ध नाहीत. मागील दुर्गाडी गडावरील दुर्गादेवीच्या मंदिराच्या मागे असलेली भिंत ‘ईदगाह’ असल्याचा दावा मुसलमानांकडून करण्यात येत आहे. मागील काही वर्षांपासून या ठिकाणी वर्षातून २ वेळा ईदच्या दिवशी नमाजपठण केले जात आहे.
अतिक्रमण करणार्यांना प्रवेश आणि मालकाला मात्र प्रवेशबंदी !
या अनधिकृत बांधकामाच्या असलेल्या म्हणजे तथाकथित ‘ईदगाह’च्या ठिकाणी ईदच्या दिवशी नमाजपठण केले जाते. एकीकडे जिल्हाधिकार्यांनी या अनधिकृत बांधकामाला पाडण्याचा आदेश दिला आहे; मात्र पोलीस आणि प्रशासन नमाजपठणावर बंदी घालण्याचे धारिष्ट्य दाखवत नाही. उलट नमाजपठणाच्या दिवशी हिंदूंना गडावर प्रवेश करण्यास बंदी घातली जाते. पोलीस अतिक्रमणाला संरक्षण देतात आणि या जागेचे मालक असलेल्या सातवाहन राजाच्या वंशजांना मात्र येथे जाण्यास बंदी घातली जाते. अशा प्रकारे मुसलमांनांच्या लांगूलचालनासाठी कायदा धाब्यावर बसवण्याचे काम पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून चालू आहे.
आधी अतिक्रमण, आता मंदिरावरही मालकी हक्क !
प्रारंभी ‘ईदगाह’ असल्याचा दावा करणार्या मुसलमानांनी या गडावरील इतिहासकालीन दुर्गादेवीच्या मंदिरावरही मालकी हक्क सांगितला आहे. कल्याण येथील काही स्थानिक मुसलमानांनी दुर्गादेवीचे मंदिरे हे ‘मैलिस-ए-मुशवरीन मशीद’ असल्याचा दावा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात केला होता. यामध्ये हा खटला वक्फ मंडळाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे.
अतिक्रमणाला दिले जात आहे पोलीस संरक्षण !
हे अतिक्रमण पाडण्याऐवजी तसा जिल्हाधिकार्यांचा आदेश असतांनाही त्यावर कार्यवाही करायचे सोडून या अतिक्रमणाला २४ घंटे राज्य राखीव पोलीस दलाचे संरक्षण देण्यात आले आहे. या अतिक्रमणाच्या संरक्षणासाठी दुर्गाडी गडाच्या अर्ध्या भागावर प्रवेशबंदी घालण्यात आली आहे; मात्र अतिक्रमण हटवण्याला पोलीस, प्रशासन आणि सरकार सिद्ध नाही.
पोलिसांकडून कार्यक्रमावर निर्बंध घातले जातात ! – सुयश शिर्केसातवाहन, सातवाहन राजाचे वंशज आणि तक्रारदार
सहस्रावधी वर्षापूर्वी हिंदु क्षत्रिय मराठा सातवाहन राजांनी कल्याण बंदर आणि दुर्गाडी गडाची निर्मिती केली होती. वंशपरंपरागत सातवाहन राजाचे वंशज म्हणून या गडाचा मालकी हक्क आमच्याकडे आहे. त्यामुळे गडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली आहे. जिल्हाधिकार्यांनी अतिक्रमण हटवण्यासाठी आदेश दिला असूनही पोलीस आमच्यावर दबाव आणत आहे. उत्सवाच्या दिवशी गडावर कार्यक्रम करण्यास पोलिसांकडून आडकाठी केली जाते, असे सातवाहन राजाचे वंशज श्री. सुयश शिर्केसातवाहन यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
(याविषयी सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत)
संपादकीय भूमिकामुसलमानांच्या अतिक्रमणावर कोणतीही कारवाई न करता त्या माध्यमातून ‘लँड जिहाद’च फोफावू देणारे पोलीस आणि महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी राष्ट्रघातकी नव्हेत का ? अशांना पदच्युतच करून कारागृहात डांबायला हवे ! |