युक्रेन हा पाश्चिमात्य देशांचा गुलाम ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन
मॉस्को – युक्रेन हा पाश्चिमात्य देशांचा गुलाम बनला आहे, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर टीका केली. रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विजय दिवस परेड’निमित्त देशवासियांना संबोधित करतांना ते बोलत होते. या वेळी त्यांनी युक्रेनची नाझींशी तुलना केली, तसेच ‘रशियाच्या विरोधात युद्ध पुकारले गले असून आम्ही आमचे संरक्षण करू. आमच्यासाठी देशापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही’, असेही सांगितले.
सौजन्य न्यूज 18 इंडिया
रशियाच्या विजय दिवस परेडचा इतिहास
रशियामध्ये प्रतिवर्षी ९ मे या दिवशी ‘विजय दिवस परेड’चे आयोजन केले जाते. ९ मे १९४५ या दिवशी सोव्हियत सैन्याने दुसर्या महायुद्धात जर्मनीचा पराभव केला होता. या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ रशिया ‘विजय दिवस परेड’ आयोजित करते.