(म्हणे) ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जावईशोध !
ठाणे – ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. प्रत्यक्षात केरळची सत्य परिस्थिती वेगळीच आहे. विदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे, त्याच्यातील ३६ टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागील वर्षी त्यांनी २.३६ लाख कोटी रुपये पाठवले. केरळचा साक्षरतेचा दर ९६ टक्के आहे, तर भारताचा ७६ टक्के आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे केले आहे. (केरळमधील साक्षरतेचा लव्ह जिहादशी काय संबंध ? सुशिक्षित तरुणीही लव्ह जिहादला बळी पडलेल्या असतांना असा अजब तर्क लावणारे जितेंद्र आव्हाड स्वतःचेच हसे करून घेत आहेत ! – संपादक)
केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. सत्य परिस्थिती केरळची वेगळीच आहे. परदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे त्याच्यातील 36 टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी 2.36 लाख कोटी रुपये पाठवले. केरळचा साक्षरतेचा दर 96… pic.twitter.com/86TZ8nnGK2
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 8, 2023
संपादकीय भूमिका
|