‘द केरल स्टोरी’वर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका
१५ मे या दिवशी होणार सुनावणी
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणार्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे. न्यायालयाने सुनावणीसाठी १५ मे हा दिनांक निश्चित केला आहे. हा चित्रपट ५ मे या दिवशी प्रदर्शित झाला आहे. केरळ उच्च न्यायालयाने त्याच दिवशी चित्रपटाचा ट्रेलर (विज्ञापन) पाहिला. यानंतर न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्यास नकार दिला. बंगालमध्ये राज्य सरकारने, तर तमिळनाडूमध्ये चित्रपटगृहांच्या मालकांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.
‘द केरला स्टोरी’ मूवी : सुप्रीम कोर्ट 15 मई को केरल हाईकोर्ट के फिल्म प्रदर्शन पर रोक लगाने के फैसले को चुनौती देने वाली याचिका पर सुनवाई करेगा #bollywood #SupremeCourt #keralaHighCourt https://t.co/nIIQLrDXDN
— Live Law Hindi (@LivelawH) May 9, 2023
१. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी स्थगिती देण्याच्या मागणीवर म्हटले होते की, चित्रपट बनवण्यासाठी अभिनेते आणि निर्माते यांनी पुष्कळ श्रम घेतले आहेत. आपण याचा विचार केला पाहिजे. चित्रपटावर बंदी घालतांना तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. हा चित्रपट चांगला कि वाईट, हे जनता ठरवेल.
२. केरळ उच्च न्यायालयानेही या चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले होते की, हा चित्रपट केवळ सत्य घटनांनी प्रेरित आहे. तो पाहिल्यानंतर चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने प्रदर्शनाला अनुमती दिली. या चित्रपटामध्ये कोणत्याही समाजाविषयी आक्षेपार्ह असे काहीच नाही. याचिकाकर्त्यांपैकी कुणीही चित्रपट पाहिलेला नाही.