उत्तरप्रदेशमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मध्यप्रदेशनंतर आता उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी मंत्र्यांसमवेत १२ मे या दिवशी हा चित्रपट पहाणार आहेत.
#Lucknow : यूपी में टैक्स फ्री हुई ‘द केरला स्टोरी’, CM योगी खुद पूरे मंत्रिमंडल के साथ देखेंगे फिल्म@myogiadityanath @CMOfficeUP #TheKeralaStory #TaxFree #FilmTaxFree #TheKeralaStoryMoviehttps://t.co/OSOA99NqXm
— भारत समाचार | Bharat Samachar (@bstvlive) May 9, 2023
राज्याचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी या चित्रपटावर बंगालमध्ये बंदी घातल्यावर बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, बंगालमधील जनता ही बंदी कधीही स्वीकारणार नाही.