सर्वांशी सर्व विषयांवर सहजतेने संवाद साधणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
प्रसिद्ध संगणकतज्ञ पद्मश्री डॉ. विजय भटकर यांनी वर्ष २००४ मध्ये सुखसागर, फोंडा येथील आश्रमाला भेट दिली. त्यांनी सनातनचे कार्य जाणून घेतले. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनीही त्यांच्याशी विज्ञान आणि अध्यात्म या विषयावर चर्चा केली. डॉ. विजय भटकर यांनी यांनीही सनातनच्या कार्यवृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या. नंतरच्या काळात सनातनला धार्मिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी पुष्कळ सहकार्य केले.