सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या हृदयांत ‘हिंदु राष्ट्र’ हे शब्द सोनेरी अक्षरांत कोरले ! – जी. राधाकृष्णन्, भाजप नेते, तमिळनाडू
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन, म्हणजे साक्षात् भगवंताचे दर्शन !
‘वर्ष २०१३ मध्ये भगवंताच्या कृपाशीर्वादाने मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे दिव्य दर्शन घेण्याची संधी मिळाली. तेव्हा मला आलेल्या अनुभूतींचे शब्दांत वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. भगवंताने त्याच्या एखाद्या भक्ताला स्थुलातून दर्शन दिल्यावर त्याला (भक्ताला) जी सकारात्मक स्पंदने जाणवतील, तशीच स्पंदने परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर मला जाणवली.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले जीवनात आल्यावर गुरु मिळाल्याचा आनंद होणे
गेल्या ४ दशकांपासून मी हिंदुत्वाचे कार्य करत आहे. मी कोणालाही माझे गुरु मानले नाही; मात्र जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्या जीवनात आले, तेव्हा मला गुरु मिळाल्याचा आनंद झाला. मी अनेक संतांचा आदर करतो; मात्र त्यांना मी कधी गुरु म्हणून माझ्या हृदयात स्थान दिले नाही. मी जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटलो, तेव्हा ते गुरुस्थान मी केवळ आणि केवळ साक्षात् भगवंताचे सत्य अवतार असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दिले.
३. पूर्वजांनी केलेल्या समष्टी सेवेमुळे हिंदुत्वाच्या कार्यात सक्रीय असल्याची जाणीव परात्पर गुरुदेवांनी करून देणे
मंदिरांची सामूहिक स्वच्छता करण्याची सेवा अनेक पिढ्यांपासून आमच्याकडे आहे. या समष्टी सेवेमुळेच मागच्या काही पिढ्यांपासून आमचे पूर्वज हिंदुत्वाच्या कार्यात सहभागी झाले असतील. ‘आमच्या पूर्वजांनी केलेल्या समष्टी सेवेमुळेच मी आज हिंदुत्वाच्या कार्यात सक्रीय आहे’, याची परात्पर गुरुदेवांनीच मला जाणीव करून दिली.
४. माझा असा अनुभव आहे की, परात्पर गुरुदेवांनी साधकांना कधीच निराश केले नाही. त्यांचे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि शिष्यांशी असलेले नाते यांची तुलना भगवंत अन् भक्त यांच्याशी करता येईल.
५. सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट, म्हणजे परात्पर गुरुदेवांनी करायला सांगितलेला कुलदेवतेचा नामजप आणि तिची उपासना; तसेच त्यांनी सर्व हिंदुत्वनिष्ठ अन् देशभक्त यांच्या हृदयांत सोनेरी अक्षरांत कोरलेले ‘हिंदु राष्ट्र’ हे शब्द !
६. हिंदुत्वाचे कार्य करतांना कितीही अडथळे आले, तरी त्यांना धैर्याने आणि सकारात्मकतेने तोंड देऊन त्यांवर मात करण्यासाठी परात्पर गुरुदेवांनीच आम्हाला सामर्थ्य दिले आहे.’
– श्री. जी. राधाकृष्णन्, भाजप नेते, तमिळनाडू (२५.४.२०२३)
परात्पर गुरुदेवांच्या कृपेने प्राण वाचल्याची अनुभूती अनेक वेळा येणे‘एकदा मी तिरुवनंतपूरम्ला गेलो असतांना मला हृदयविकाराचा झटका आला आणि मला रुग्णालयात भरती करावे लागले. तेथील आधुनिक वैद्य मला अतीदक्षता कक्षात (‘आयसीयू’मध्ये) घेऊन जात होते. मी त्यांना म्हणालो, ‘‘चेन्नईला जाऊन मी उपचार घेतो.’’ त्या वेळी आधुनिक वैद्यांनी मला ‘तुमच्याकडे केवळ ४ घंटे आहेत. तुम्ही तुमच्या जोखमीवर जाऊ शकता’, असे सांगितले. परात्पर गुरुदेवांवर असलेल्या श्रद्धेच्या बळावर मी आधुनिक वैद्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही जे सांगत आहात, ते वैद्यकीयदृष्ट्या कदाचित् योग्य असेलही; परंतु माझी त्या महाशक्तीवर, माझ्या गुरुदेवांवर पूर्ण श्रद्धा आहे. ते माझी निश्चितच काळजी घेतील आणि माझे रक्षण करतील.’’ कोणत्याही अडथळ्याविना मी चेन्नईला पोचलो आणि तेथे वैद्यकीय उपचार घेतले अन् बरा झालो. परात्पर गुरुदेवांनी त्यांच्या आध्यात्मिक शक्तीने अनेक वेळा माझे प्राण वाचवले आहेत. माझ्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत.’ – श्री. जी. राधाकृष्णन्, भाजप (२५.४.२०२३) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार हिंदुत्वनिष्ठांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |