सांताक्रूझ (मुंबई) येथे धर्मांधाकडून हिंदु प्रेयसीवर भररस्त्यात चाकूने आक्रमण !
मुंबई – हिंदु प्रेयसी फसवत असल्याच्या संशयावरून तिचा मुसलमान प्रियकर समीर शेख (वय ३० वर्षे) याने तिच्यावर चाकूने आक्रमण केले. हा प्रकार सांताक्रूझ (पूर्व) येथे घडला. या वेळी आरोपीने तिच्या मित्रावरही आक्रमण केले. हिंदु युवती आणि तिचा मित्र यांना रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले असून याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हिंदु युवती तिचा मित्र फराज अन्सारी (वय ३० वर्षे) याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याकडे गेली होती. त्या वेळी फराजची मैत्रीण शाझिया खान (तक्रारकर्ती) आणि युवतीचा मित्र रिफाकत वडगामा, तसेच अन्य उपस्थित होते. रात्री वाढदिवस साजरा करून ते पहाटे ५ वाजता फिरण्यासाठी बाहेर आल्यावर मुंब्रा येथे रहाणारा त्या हिंदु तरुणीचा प्रियकर समीर शेख तेथे आला. त्या वेळी त्याने हिंदु युवतीला मारहाण केली, तिचा भ्रमणभाष हिसकावून घेतला आणि वडगामाकडे बोट दाखवत ‘तो कोण आहे ?’, असे विचारले. तरुणीने तो मित्र असल्याचे सांगितल्यावर शेखने तिलाच शिवीगाळ करत चाकूने तिच्यावर आक्रमण केले. वडगामाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शेखने त्याच्यावरही आक्रमण केले. ‘नंतर शेख घटनास्थळावरून पळून गेला’, असे शाझिया खान हिने तक्रारीत म्हटले आहे. (अशी घटना आपल्या संदर्भात घडू नये, यासाठी अन्य हिंदु तरुणींनी वेळीच सतर्क व्हावे ! – संपादक)
हिंदु तरुणी दुसर्या तरुणाला भेटते, या संशयावरून गेल्या २ मासांपासून आरोपी शेख तिच्याशी भांडत होता. (संशयात प्रेम नसते, हे हिंदु तरुणींच्या कधी लक्षात येणार ? – संपादक) या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका
|