कोल्हापूर येथे ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘द केरल स्टोरी’चे विनामूल्य आयोजन !
कोल्हापूर, ८ मे (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’ची वास्तवता महिला-युवती यांच्या लक्षात येण्यासाठी ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने प्रभात चित्रपटगृह येथे ७ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता विनामूल्य खेळाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेमाच्या जाळ्यात फसवून ‘इस्लामिक स्टेट’सारख्या धोकादायक आतंकवादी संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी नेण्यात आलेल्या १-२ नव्हे, सहस्रावधी हिंदु आणि ख्रिस्ती युवतींचा ‘लव्ह’पासून ते ‘जिहाद’पर्यंत भयावह प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. या संदर्भातील जागरूकता महिलांमध्ये निर्माण करण्यासाठी या खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. संभाजीराव साळुंखे, श्री. सनी पेणकर यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी महिला-युवती यांनी ‘भारतमाता की जय’, ‘जय श्रीराम’, ‘वन्दे मातरम्’च्या दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या प्रसंगी महिला-युवती यांनी ‘लव्ह जिहाद’ची माहिती देणारे ‘पोस्टर’ हातात घेतले होते.
या चित्रपटगृहाच्या शेजारी ‘लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे’ आहे. चित्रपटगृहाच्या बाहेर अनेक महिला-युवती यांना पाहून लगेच तिथे पोलीस आले. पोलिसांनी अनेकांची छायाचित्रे काढली, व्हिडिओ सिद्ध केले, तसेच तेथे उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांची नावे लिहून घेतली. वास्तविक पहाता येथे आलेले सर्वच जण राष्ट्रप्रेमी होते, तर सामान्य घरातून आलेल्या अनेक महिलाही होत्या, तरीही उपस्थितांची अधिकाधिक माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता. (पोलिसांनी अशीच सतर्कता आतंकवाद्यांच्या संदर्भात दाखवली असती, तर आतंकवाद संपुष्टात आला असता ! – संपादक) |