अतिक अहमद याची फरार पत्नी शाईस्ता परवीन ‘माफिया’ घोषित !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – काही दिवसांपूर्वी हत्या झालेला कुख्यात गुंड अतिक अहमद याची पत्नी शाईस्ता परवीन हिला उत्तरप्रदेश पोलिसांनी ‘माफिया’ घोषित केले. राजू पाल हत्या प्रकरणात शाईस्ता परवीन आरोपी असून सध्या ती फरार आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, शाईस्ता परवीन ही स्वतःसमवेत नेमबाज (शूटर्स) घेऊन फिरते. यासह अतिक अहमद आणि हत्या झालेला त्याचा भाऊ असद यांच्या साथीदारांना हाताशी धरून तिने एक टोळी बनवली असल्याचेही सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी परवीन ही असद याचा मित्र आतिन जफर याच्या घरी थांबली होती. जफर याने परवीन हिच्यासह तिच्यासमवेत असलेल्या नेमबाजांनाही आश्रय दिला होता. ही माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाड टाकली; मात्र त्याआधीच परवीन तेथून पळून गेली. या प्रकरणी पोलिसांनी जफर याला २ मे या दिवशी अटक केली आहे.
Atiq Ahmed’s fugitive wife Shaista Parveen declared ‘mafia’ by Uttar Pradesh police, reveals fresh FIR: Full detailshttps://t.co/boSrDoF38k
— OpIndia.com (@OpIndia_com) May 8, 2023
संपादकीय भूमिका
|