छत्रपती संभाजीनगर येथे पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू !
२ जणांची प्रकृती चिंताजनक !
छत्रपती संभाजीनगर – येथे चेंबरचे काम करतांना ४ जण पाण्यात बुडाले. शहरातील सलीम अली सरोवर परिसरातील मलजल प्रक्रिया केंद्र येथे ८ मे या दिवशी ही घटना घडली. चेंबरमध्ये बुडालेल्या चौघांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार चालू आहेत. घटनेची महिती मिळताच मृतांच्या कुटुंबियांनी घाटी परिसरात धाव घेतली. अंकुश थोरात (वय ३२ वर्षे) आणि रावसाहेब घोरपडे (वय ३३ वर्षे) अशी मृत कामगारांची नावे असून विष्णू उगले अन् बाळू खरात यांची प्रकृती चिंताजनक आहे.