बंगालमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी !
तृणमूल काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेषी आणि जिहादी आतंकवादप्रेमी निर्णय !
कोलकाता (बंगाल) – बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने लव्ह जिहादची भीषणता आणि जिहादी आतंकवादाचे षड्यंत्र उघड करणारा ‘द केरल स्टोरी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. यासाठी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊन हिंसाचार होण्याची शक्यता असल्याचे कारण देण्यात आले आहे.
(म्हणे) ‘दे केरल स्टोरी’ विकृत कथा ! – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने फिल्म ‘द केरल स्टोरी’ को बैन करने का फैसला किया है. ममता ने राज्य के चीफ सेक्रेटरी को आदेश दिए हैं कि बंगाल के थिएटरों से फिल्म को हटाया जाए. कहा जा रहा है कि ये फैसला बंगाल में शांति बनाए रखने के लिए लिया गया है. ताकि शहर में हिंसा और… pic.twitter.com/zfvPgyOf3X
— AajTak (@aajtak) May 8, 2023
या चित्रपटाविषयी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले की,
१. ‘द केरल स्टोरी’ चित्रपटात दाखवण्यात आलेली कथा काल्पनिक आहे. यात काहीच वास्तविकता नाही. (हे ममता बॅनर्जी यांनी कसे ठरवले ? या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी ४ वर्षे संशोधन करून पुराव्यांच्या आधारे हा चित्रपट बनवला आहे. ममता बॅनर्जी ‘या चित्रपटात वास्तविकता नाही’, हे कशाच्या आधारे सांगत आहेत, हे त्यांनी पुराव्यासह स्पष्ट केले पाहिजे ! – संपादक)
२. ‘द काश्मीर फाइल्स’ काय होता ? तो एका वर्गाला अपमानित करणारा चित्रपट होता. (द कश्मीर फाइल्समधील प्रत्येक प्रसंग हे वास्तविक आणि प्रत्यक्षदर्शिंनी सांगितलेल्या घटनांवरून बनवण्यात आला आहे. हिंदूंच्या वंशसंहाराची हृदयद्रावक घटना दाखवण्यात आल्या असतांना त्या पीडित हिंदूंचा अशा प्रकारे अवमान करून ममता बॅनर्जी जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालत आहेत, हे हिंदूंनी नेहमीच लक्षात ठेवावे ! – संपादक)
३. ‘द केरल स्टोरी’ काय आहे ? ही एक विकृत कथा आहे. आम्ही या चित्रपटावर बंगालमध्ये बंदी घातली आहे. हा निर्णय द्वेष आणि हिंसा यांच्या घटना होण्यापासून रोखण्यासाठी आणि राज्यात शांतता स्थापन करण्यासाठी घेतला आहे. (ममता बॅनर्जी यांना श्रीरामाचे नाव घेतल्यावरही त्रास होतो, त्यांना हिंदूंवरील अत्याचारांविषयी कधीही सहानुभूती असणार नाही, हे स्पष्ट आहे. बंगालमधील हिंदूंनी हे लक्षात घेऊन ‘भविष्यात बंगालची काश्मीरसारखी स्थिती झाल्यावर काय होईल ?’, याचा आताच विचार करून संघटित व्हावे ! – संपादक)
संपादकीय भूमिकातृणमूल काँग्रेस सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात देशभरातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक आहे. हा हिंदूंवरील अत्याचारला दडपण्याचाच हुकूमशाही प्रकार आहे. लोकशाहीच्या गप्पा मारणार्या ढोंगी राज्यकर्त्यांचा हा लोकशाहीद्रोह आहे ! |