पुढील वर्षी होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत अध्यक्षपदी रहाणार ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
सोलापूर – सुप्रिया सुळे यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा विचार आताच करता येणार नाही. पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यासाठी मी निवृत्ती मागे घेतली. पुढील वर्षी होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत मीच अध्यक्षपदी रहाणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
Live Update
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारच
मान राखून निवृत्तीचा निर्णय मागे- शरद पवार
मविआसाठी कायम अग्रणी राहणार- पवार
बातमी पाहा- https://t.co/gcOTrgBIBn@PawarSpeaks @NCPspeaks @AjitPawarSpeaks #NCP #marathinews #maharashtrapolitics #zee24taas pic.twitter.com/xsa73ea7UJ— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 5, 2023
शरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचे लिखाण दैनिक ‘सामना’मध्ये करण्यात आले आहे. याचा संदर्भ देत पत्रकारांनी ८ मे या दिवशी शरद पवार यांना विचारणा केली असता त्यांनी वरील वक्तव्य केले. ‘मी पक्षाचा वारसदार निर्माण करू शकलो नाही, हे त्यांचे मत आहे’, असेही या वेळी शरद पवार म्हणाले.