तिहार कारागृह प्रशासनाने गुंड टिल्लू ताजपुरिया याला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही ? – देहली उच्च न्यायालय
नवी देहली – तिहार कारागृह प्रशासनाने गुंड टिल्लू ताजपुरिया याला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही ?, असा प्रश्न देहली उच्च न्यायालयाने तिहार कारागृहाच्या प्रशासनाला विचारला. काही दिवसांपूर्वी गुंड टिल्लू ताजपुरिया याची तिहार कारागृहात अन्य गुंडांनी हत्या केली होती. न्यायालयाने प्रशासनाकडे याविषयीचा अहवाल मागितला असून कारागृहाच्या अधीक्षकांना न्यायालयाचा उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे. ‘अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाऊ शकत नाहीत’, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
[Tillu Tajpuriya Murder] “Why No Remedial Action Yet?”: Delhi High Court Asks Authorities of Tihar Jail where on May 2nd, four co-inmates dragged the gangster out of his cell and stabbed him to death.@SukritiMishra12 reportshttps://t.co/hTw11lU5Pw
— LawBeat (@LawBeatInd) May 8, 2023
ताजपुरिया याचा भाऊ आणि वडील यांनी एका याचिकेद्वारे या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने कारागृह प्रशासनाला वरील प्रश्न विचारला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ मे या दिवशी आहे.